नांदाफाटा :
बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त १ जूनला कवठाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.गिरीधर काळे मित्रमंडळ व आरोग्य विभागाच्या वतीने सकाळी ११ वाजता प्राथमीक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर सुरु होईल.
अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे राहतील. उद्घाटन माजी पं.स.सदस्य सविता काळे करतील. विशेष अतिथी म्हणून पं.स.कोरपनाचे माजी सभापती मदन सातपुते, गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ.अरविंद ठाकरे, कवठाळा येथील सरपंच नरेश सातपुते, सामाजिक कार्यकर्ते विकास दिवे, डॉ. रवींद्र हेपट, ज्येष्ठ नागरिक मिन्नाथ बोबडे, शंकर बोढे, रवींद ठाकरे आदी उपस्थित राहतील.
बिबी येथे मागील ३५ वर्षांपासून अस्थिरुग्णांवर डॉ.गिरीधर काळे निःशुल्क सेवा करीत आहे. आजतागायत चार लाखांहून अधिक हाडाच्या रुग्णांवर उपचार करून त्यांनी बरे केले आहे. ग्रामसभेने त्यांना ‘डॉक्टर’ ही ऐतिहासिक उपाधी देऊन सन्मानित केले. त्यांच्या सेवेला सलाम म्हणून रक्तदानाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. रक्तदान शिबीराला उपस्थित राहून नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन तालुका आरोग्य विभाग व गिरीधर काळे मित्रमंडळा रत्नाकर चटप, मनोज भोजेकर, पुरुषोत्तम निब्रड, ॲड.दीपक चटप, अविनाश डोहे, बंडू येटे, विजय निखाडे, संभा इसनकर, विजय मसे, दत्तुजी बदखल, नथ्थू धारणे, विलास गिरटकर, आनंदराव टेकाम, अशोक भोंगळे, प्रमोद आगलावे, मनोज टिपले, दत्तू रणदिवे, मधुकर बेरड, प्रमोद आगलावे, निशिकांत डोहे, गुरुदेव सेवा मंडळ, स्टुडंट्स फोरम ग्रुप, पाथ फाउंडेशन तसेच परिसरातील सामाजिक संस्थांनी केले आहे.
======