भद्रावती :
स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. भद्रावती र.न. 857 च्या निवडणूक प्रक्रियेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, चंदपूर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, व भद्रावती पंचायत समिती सदस्य नागोराव बहादे यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजूर सहकार पैनल उभे करण्यात आले आहे.
या पैनल मध्ये सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून भद्रावती येथून अरूण सदाशिव घुघुल, रोहन कवडू खुटेमाटे, गवराला व चिरादेवी येथून ज्ञानेश्वर राजाराम डुकरे, ढोरावासा येथून सतिश मधु वरखडे, बरांज, किलोनी व कढोली येथून अजित निळकंठ फाळके, कुणाडा, तेलवासा व चारगाव येथून विश्वास पुरुषोत्तम कोंगरे, चेकबरांज, घोटनिंबाला, सुमठाना, पिपराबोडी, खापरी येथून नरेश दुर्योधन काळे, देऊलवाडा येथून प्रेमदास कान्होबाजी आस्वले, अनुसूचित जाती/जमाती या गटातून भारत गोसाई नगराळे, इतर मागासवर्गीय गटातून रामचंद्र संभाजी वांढरे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून साहेबराव उधवराव घोरुडे, महिला राखीव गटातून सुषमा श्रीनिवास शिंदे, मनीषा राजू सातपुते असे एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
यापैकी अजित फाळके, विश्वास कोंगरे, नरेश काळे, प्रेमदास आस्वले, भारत नगराळे हे अविरोध निवडल्या गेले आहेत.
यावेळी रवींद्र शिंदे, नागो बहादे, भास्कर ताजने, गणेश जीवतोडे, महेश झाडे, मारोती निखाडे, अशोक निखाडे, सत्तार भाई, राजू सातपुते, गजानन आस्वले आदी उपस्थित होते.