• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
October 12, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग
Spread the Information

अहेरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या प्रश्नावर आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा परिणाम दिसून आला आहे. दोन दिवसांत पदभरतीसह आवश्यक कार्यवाही करण्याचा इशारा मिळताच आरोग्य विभागाने हालचालींना वेग दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून, प्रतिनियुक्तीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही परत बोलावण्याची कार्यवाही केली आहे. या निर्णयाची माहिती आमदार आत्राम यांना देण्यात आल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा निर्णय त्यांनी तूर्त मागे घेतला आहे.

RelatedPosts

गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांना अटक; वनविभागाची धडक कारवाई

मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण; आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम!

४२ मंजूर पदांपैकी २७ भरलेली, १५ रिक्त!

दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्चून अहेरी येथे महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, रुग्णालयातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेबाबत प्रश्न उपस्थित होत होते. उपलब्ध पदनिहाय माहितीनुसार, रुग्णालयासाठी ४२ नियमित पदे मंजूर असून, त्यापैकी २७ पदे भरलेली तर १५ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, बालरोग परिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषधनिर्माता आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पदांचा यात समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रुग्णालयाचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोग्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. महिनाभरात रिक्त पदे भरण्याची ग्वाही देण्यात आल्याचे सांगितले जात असतानाही मनुष्यबळाचा प्रश्न कायम राहिल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

अल्टिमेटम मिळताच आरोग्य विभागाची हालचाल

रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत आणि प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना परत बोलवावे, अशी मागणी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केली होती. दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास १३ ऑक्टोबर रोजी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
या इशाऱ्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी तातडीने दखल घेत काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही परत बोलावण्यात आले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी आमदार आत्राम यांची भेट घेऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. आरोग्य विभागाच्या या निर्णयानंतर आमदारांनी कुलूप ठोकण्याची भूमिका तूर्त मागे घेतली.
मात्र, उर्वरित तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे न भरता रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा प्रकार घडल्यास आरोग्य विभागाची खैर नाही, असा स्पष्ट इशाराही आमदार आत्राम यांनी दिला आहे.

———————————–
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नागरिकांसाठी अहेरी येथील महिला व बाल रुग्णालय महत्त्वाचे आहे. दुर्गम भागातील गरोदर माता, नवजात बालके आणि लहान मुलांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्यावर भर दिला जात आहे. तज्ज्ञ व इतर डॉक्टरांच्या १६ मंजूर पदांपैकी १३ पदे भरली असून, उर्वरित तीन पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
-डॉ. रवी गावंडे, जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिरोली

Previous Post

अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांना अटक; वनविभागाची धडक कारवाई

Next Post

गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

October 13, 2026
वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

October 13, 2026
गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

October 12, 2026
आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग

आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग

October 12, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1