• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

सी-६० दलाचे संस्थापक के. पी. रघुवंशी यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव; चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षाला पूर्णविराम

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
October 2, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
सी-६० दलाचे संस्थापक के. पी. रघुवंशी यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव; चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षाला पूर्णविराम
Spread the Information

गडचिरोली : केवळ ६० निवडक जवानांपासून सुरू झालेल्या सी-६० दलाच्या शौर्यगाथेने महाराष्ट्रातील चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षाचा निर्णायक टप्पा गाठला आहे. मे २०२६ मध्ये गडचिरोली जिल्हा सशस्त्र माओवादी कॅडरपासून मुक्त झाल्यानंतर महाराष्ट्राच्या अभिलेखावर एकही सक्रिय सशस्त्र माओवादी शिल्लक राहिलेला नाही. या ऐतिहासिक वाटचालीची मुहूर्तमेढ रोवणारे सी-६० दलाचे संस्थापक तथा सेवानिवृत्त भा.पो.से. अधिकारी के. पी. रघुवंशी यांचा मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात १ ऑक्टोबर रोजी पोलीस महासंचालकांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांवर वनगुन्हा दाखल

मुधोली शाळेच्या विकासाला नवी दिशा; शाळा व्यवस्थापन समितीची निवड

मानव विकास, जिजाऊ योजनेतून अतिरिक्त बससेवेची मागणी

गडचिरोली परिक्षेत्रात यापूर्वी सेवा बजावलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सी-६० दलाच्या चार दशकांच्या प्रवासाचा, शौर्याचा आणि माओवादविरोधी अभियानातील योगदानाचा आढावा घेण्यात आला.
के. पी. रघुवंशी हे १९८० च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून, ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विशेष कृती दल, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयासारख्या महत्त्वाच्या घटकांचे नेतृत्व केले. २०१५ मध्ये ते महाराष्ट्र सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून सेवानिवृत्त झाले.

६० जवानांपासून सी-६०चा प्रवास

१९८०च्या दशकाच्या सुरुवातीस तेलंगणा भागातून सशस्त्र दलम दक्षिण गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात माओवादी चळवळीचा शिरकाव झाला. विरळ प्रशासन, विखुरलेल्या आदिवासी वस्त्या, विस्तीर्ण जंगल आणि स्थानिक प्रश्नांचा फायदा घेत माओवाद्यांनी आपला प्रभाव वाढविला.या पार्श्वभूमीवर तत्कालीन गडचिरोली पोलीस अधीक्षक के. पी. रघुवंशी यांनी १ डिसेंबर १९९० रोजी केवळ ६० निवडक जवानांसह सी-६० दलाची स्थापना केली. स्थानिक भूभागाची माहिती असलेल्या तसेच गोंडी आणि माडिया भाषा जाणणाऱ्या युवकांच्या माध्यमातून माओवाद्यांविरोधात त्यांच्या भूमीतच लढा देण्याची संकल्पना त्यांनी मांडली. १९९४ मध्ये दक्षिण गडचिरोलीसाठी सी-६०ची स्वतंत्र शाखा निर्माण करण्यात आली.
आज गडचिरोलीत सी-६०ची २९ पथके असून त्यात ९६१ जवान कार्यरत आहेत. गोंदियात ९ पथकांमध्ये १६६ जवान कार्यरत आहेत. या दलाला ड्रोन, एमपीव्ही, बीडीडीएस आणि श्वान पथकांचेही पाठबळ मिळत आहे.

अनेक निर्णायक चकमकींनी बदलली माओवादविरोधी लढ्याची दिशा

माओवादविरोधी संघर्षात महाराष्ट्रातील २४४ पोलीस अधिकारी व जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले, तर माओवाद्यांकडून ६०९ नागरिकांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अभियानात आतापर्यंत ३६३ माओवादी ठार, ५५८ अटक आणि ८६१ जणांनी आत्मसमर्पण केले आहे.२०१८ मधील बोरिया-कसनासूर चकमकीत ४० माओवादी ठार झाले. २०२१ मधील मर्दिनटोला चकमकीत केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २७ माओवादी ठार झाले. २०२४ मधील वांढोली चकमकीत १२ माओवादी ठार करण्यात आले. २०२६च्या सुरुवातीला फोदेवाडा परिसरातील अभियानात माओवादी कमांडर प्रभाकर याचा खात्मा करण्यात आला. या अभियानात जवानांनी तीन दिवस आणि तीन रात्री सीमापार छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात कारवाई केली.

‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ने माओवादविरोधी अभियानाचा निर्णायक शेवट

मे २०२६ मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांच्या सीमावर्ती भागात विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत आठ माओवाद्यांना अटक करण्यात आली, तर पाच जणांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या अभिलेखावर एकही सक्रिय सशस्त्र माओवादी शिल्लक राहिला नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ८१९ सशस्त्र माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यामध्ये डीकेएसझेडसी सदस्य गिरीधर तुमरेटी, त्यांची पत्नी ललिता, डीकेएसझेडसी सदस्य तारक्का तसेच केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती यांच्या आत्मसमर्पणाचा समावेश आहे.

शौर्याची मोठी परंपरा

सी-६० दलातील अधिकारी व जवानांना आतापर्यंत ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती शौर्य पदके, ३५८ पोलीस शौर्य पदके आणि २२ राष्ट्रपती पोलीस पदके मिळाली आहेत. २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रथमच सी-६० सेवा पदक जाहीर केले. त्याअंतर्गत गडचिरोली पोलीस दलातील ४२५ अधिकारी व जवानांचा सन्मान करण्यात आला आहे.
माओवादमुक्तीनंतरही शांतता कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, भूसुरुंग निकामी करून क्षेत्र स्वच्छता, आत्मसमर्पितांचे पुनर्वसन आणि नागरिकांचा विश्वास वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत १४ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला असून, प्रोजेक्ट उडानद्वारे १६ हजार ३४३ युवकांना रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी १० हजार ७३० युवकांना रोजगार मिळवून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रस्ते, पूल आणि मोबाईल टॉवरच्या माध्यमातून विकासाला गती

दुर्गम भागात ‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमांतर्गत ७५ नवीन वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. तसेच ८७ दुर्गम-अतिदुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच बससेवा पोहोचली आहे. पोलीस दलाच्या सुरक्षा आणि सहकार्यामुळे जिल्ह्यात ४२३ किलोमीटर रस्ते, ६५ पूल आणि ६२८ मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याचेही या वेळी सांगण्यात आले.सन्मान सोहळ्यात पोलीस महासंचालकांनी सी-६०च्या योगदानाचा गौरव करताना, “१९९० मध्ये ६० जवानांपासून सुरू झालेल्या सी-६० दलाने चार दशकांपासून सुरू असलेल्या माओवादाचा अंत केला आहे. सी-६० हा आपला वारसा असून गडचिरोलीतील शांतता हा त्याचा पुरावा आहे,” असे गौरवोद्गार काढले.
यावेळी सी-६०ची संकल्पना पुढे नेणारे पोलीस अधिकारी, जवान, सी-६० पार्टी कमांडर तसेच सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या जवानांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. माओवादविरोधी लढ्यात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या २४४ शहीद पोलीस अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सी-६० दलाची उल्लेखनीय कामगिरी, प्राप्त शौर्य पुरस्कार आणि अधिकारी-जवानांच्या योगदानाचा आढावा सादर केला. यावेळी गडचिरोली परिक्षेत्रात यापूर्वी सेवा बजावलेल्या माजी पोलीस अधीक्षकांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव व आठवणींना उजाळा दिला.

Previous Post

धाबा शेतशिवारात वाघिणीच्या पगमार्कने खळबळ

Next Post

सी-६० दलाचे संस्थापक के. पी. रघुवंशी यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव; चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षाला पूर्णविराम

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांवर वनगुन्हा दाखल

अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांवर वनगुन्हा दाखल

October 5, 2026
मुधोली शाळेच्या विकासाला नवी दिशा; शाळा व्यवस्थापन समितीची निवड

मुधोली शाळेच्या विकासाला नवी दिशा; शाळा व्यवस्थापन समितीची निवड

October 5, 2026
मानव विकास, जिजाऊ योजनेतून अतिरिक्त बससेवेची मागणी

मानव विकास, जिजाऊ योजनेतून अतिरिक्त बससेवेची मागणी

October 3, 2026
अष्टभुजा वॉर्डात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

अष्टभुजा वॉर्डात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

October 2, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1