चंद्रपूर :- गुरुवार 14 एप्रिलला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समितीचे अध्यक्ष रामचंद्र चंदनखेडे यांनी अभिवादन केले तसेच सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली व अल्पोपहार वाटप करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य खर्चीले देशात समाजात प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी संविधान दिले त्यांच्या संविधानावर व विचारावर प्रत्येकाने चालण्याची गरज आहे. समाजातील अस्पृश्य, शोषित, पीडित, दिनदुबळे व उपेक्षितांसाठी आवाज उठवीला समाजात सामान दर्जा मिळवून देण्याचे कार्य केले त्यांना असमानता मान्य नव्हती दलित, शोषित, पीडित, अस्पृश्य, दिनदुबळ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपला देह जिझवला आयुष्यभर लढा दिला. जातीभेद नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. भारतीय राज्यघटना लिहून संविधानाचे शिल्पकार बनले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, माजी पंस सभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुमताई सातपुते, सुचिता लुटे, सिनू इसारप, पूजा दुर्गम, नंदा कांबळे, प्रवीण सोदारी, अनिरुद्ध आवळे, विनोद चौधरी, दयाल साठे, शाम आगदारी, निरंजन नगराळे, दिलीप कांबळे, अमोल थेरे, अरुण साठे, मल्लेश बल्ला, बबलू सातपुते, भारत टिपले, विनोद जंजर्ला, मनमोहन महाकाली, पांडू थेरे, सिनू कोत्तूर, दिलीप रामटेके, शरद गेडाम, लहानुबाई कासवटे, सुनील बाम, मनीष यार्दी, आशिष वनकर, हेमराज बोंमले, नीरज डांगे, असगर खान, मधुकर खिडे, देवानंद ढेंगळे, गजू पाझारे, शुभम बावनकुळे, सुनील श्रीवास उपस्थित होते.