• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

अंबरनाथमध्ये सर्पदंशाने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयावर निष्काळजीपणाचा ठपका

आधी सापाचा फोटो दाखवा मागच उपचार करू नातेवाईकांचा आरोप ; रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

Ashish Ghume by Ashish Ghume
June 6, 2026
in महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
अंबरनाथमध्ये सर्पदंशाने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयावर निष्काळजीपणाचा ठपका
Spread the Information

बदलापूर प्रतिनिधी: घरात खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षीय चिमुकल्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या घटनेनंतर उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आधी सापाचा फोटो दाखवा, मगच उपचार सुरू करू, असा आग्रह डॉक्टरांनी धरल्यामुळे उपचारास विलंब झाला आणि त्यातच मुलाचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत उपचारात कोणतीही दिरंगाई झाली नसल्याचा दावा केला आहे.

RelatedPosts

राजवडीत उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

ना बाप बड़ा, ना भैया… सबसे बड़ा रुपया!

दुष्काळाशी लढण्यासाठी आठ गावांचे श्रमदान; ५.५० लाख लिटर पाणीसाठा क्षमता वाढवली

अंबरनाथच्या पूर्व भागात शिलाहारकालीन शिवमंदिर जवळील प्रकाश नगर भागात सुलतान शेख हा ३ वर्षांचा चिमुरडा आपल्या घरात खेळत होता. खेळत असतानाच अचानक एका विषारी सापाने त्याच्या कमरेला दंश केला. सुलतानला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत त्याला तात्काळ उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी मुलावर तातडीने उपचार सुरू करण्याऐवजी, कोणता साप चावला आहे ते समजण्यासाठी आधी त्या सापाचा फोटो दाखवा, मगच उपचार करू असा अजब अट्टाहास धरल्याचा आरोप शेख कुटुंबीयांनी केला आहे.सापाचा फोटो शोधण्यात आणि डॉक्टरांशी वाद घालण्यात मौल्यवान वेळ वाया गेला आणि याच दिरंगाईमुळे उपचाराला उशीर होऊन सुलतानचा मृत्यू झाला, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. हसण्या व खेळण्याच्या वयात मुलाचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने संतप्त आणि दुःखी झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त करत गोंधळ घातला.

मध्यवर्ती रुग्णालयातील प्रशासनाने आणि संबंधित डॉक्टरांनी शेख कुटुंबीयांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. बालकाला रुग्णालयात आणले तेव्हा त्याची प्रकृती आधीच कमालीची खालावली होती. डॉक्टरांनी कोणतीही दिरंगाई न करता उपलब्ध वैद्यकीय उपचार पद्धतीनुसार तात्काळ उपचार सुरू केले होते, असा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला आहे. बालकाला रुग्णालयात आणण्यास कुटुंबीयांकडूनच उशीर झाला असावा आणि विष शरीरात वेगाने पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले आहे. आता या प्रकरणात नक्की चूक कोणाची, याचा तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

विमानतळ भूसंपादनावर तात्पुरती ब्रेक; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा नंतर

Next Post

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

November 5, 2026
ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

November 5, 2026
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1