कोरची/ गडचिरोली
कूरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०२ एप्रिल २०२२ रोजी पोलीस प्रशासनाअंतर्गत बेडगाव पोलीस मदत केंद्र यांचे वतीने गूढीपाडव्याच्या तसेच मराठी नववर्षाच्या निमीत्याने बेडगाव गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
एप्रिल महीना सूरू होत असल्याने एप्रिल फुल करण्यापेक्षा गावातील प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून एप्रिल कूल करण्यावर भर देण्यासाठी त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत असणारे तापमान आटोक्यात आणण्याकरीता बेडगाव पोलिसांनी झांडाचे महत्व पटवून देण्यात आले तसेच या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये १०१ फळ झांडाची खडडे खोदून वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपण कार्यक्रम सकाळी ०७.०० वाजता पासुन ०९.३० पर्यंत राबविण्यात आला.
यावेळी पोलीस मदत केद्र बेडगाव येथील प्रत्येक अमंलदारांनी गावातील एक व्यक्तीला एक फळझाडाचे रोपटे देवून ते त्याच्या घरासमोर स्वता लावून देवून त्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये पोउपनि अनिल नाणेकर पोलीस मदत केंद्र बेडगाव, पोउपनि प्रबोधन जोंधळे तसेच पोलीस मदत केंद्र, बेडगाव येथील सर्व पोलीस अमंलदार, एसआरपीएफ गुप०४ चे अधिकारी व अमंलदार,संरपंच चेतनजी किरसान तसेच गावातील बहुसंखेने नागरीक उपस्थीत होते.