अहेरी: राजनगरी अहेरीला सुंदर, सुटसुटीत शहर बनवण्यासाठी आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी कंबर कसली आहे. शहरातील मुख्य रस्ते व शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे तातडीने हटवून जागा सरकारजमा करण्याचे कडक आदेश त्यांनी विविध विभागांच्या आढावा बैठकीत दिले.
अहेरीतून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मोजणी व सीमांकन करावे,रस्त्याच्या कडेला असलेली अनधिकृत बांधकामे व वनजमिनीवरील अतिक्रमणे काढण्याचेही सांगितले.
मंगळवारी राजवाड्यात घेतलेल्या सभेत
सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा, मुख्याधिकारी गणेश शहाणे, गटविकास अधिकारी गणेश चव्हाण, नायब तहसीलदार नरेंद्र दाते, भूमी अभिलेख उपअधीक्षक जी. बी. रणदिवे, पीआय हर्षल एकरे व वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे.
पर्लकोटा पुल मार्गी लागला
भामरागड येथील पर्लकोटा नदीवरील नवीन पुलाचे काम न्यायालयीन अडथळा दूर होऊन वेगाने पुढे जाईल. कमी उंचीच्या जुन्या पुलामुळे पावसाळ्यात तुटणारा संपर्क आता सुटेल.विशेष: अतिक्रमणातील दुकानदारांना तात्पुरती पर्यायी जागा देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आलापल्लीकरांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
आलापल्ली गावातील ३,५०० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण; लवकरच हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार. तसेच, वीर बाबुराव चौक सौंदर्यीकरणासाठी १५ लाखांचा निधी मंजूर असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.













