वरोरा :- महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंदनिकेतन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाद्वारे एम ए अर्थशास्त्र भाग 1 व 2 च्या विद्यार्थ्यांची प्रकल्प भेट म्हणून नुकतीच हेमलकशाला भेट देण्यात आली. या प्रकल्प भेटीचे आयोजन 9 मार्च ते 10 मार्च या कालावधीमध्ये करण्यात आले होते.अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाच्या भेटीचे आयोजन करण्यात आले. हेमलकसा इथे पद्मश्री डॉ प्रकाश आमटे व मंदा आमटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व हेमलकसा प्रकल्प उभारणीतील संघर्ष विद्यार्थ्यांसमोर कथन केला तसेच डॉ.प्रकाश आमटे यांनी हेमलकसातील प्राणी स्वतः दाखवून त्यांची माहिती पण विद्यार्थ्यांना दिली.या भेटीमुळे विद्यार्थी खूप भारावून गेले. आदिवासीचे जीवन प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आदिवासी गावांना भेटी देण्यात आल्या.या आदिवासी गावांच्या भेटीतून विद्यार्थ्यांना आदिवासी जीवनाची खऱ्या अर्थाने ओळख झाली. हेमलकसा येथील कार्यकर्ते विलास मनोहर , सचिन मुक्कामवर यांचे ही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले
जवळजवळ अर्थशास्त्राचे 35 विद्यार्थी व अर्थशास्त्र विषयाचे काही शिक्षक या सहलीत सहभागी झाले होते. हेमलकसा प्रकल्प भेटीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे , प्रा.मोक्षदा नाईक तसेच आनंदवन ग्रामवासी या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले.