कोरची
तालुक्यामुख्यालया पासुन जवळच असलेल्या कोचीनारा येथे जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत कार्यन्वीत जिवनज्योती महिला प्रभाग संघ कोचीनारा यांचे वतीने महिला दिन साजरा करण्यात आले.
तहसीलदार सी आर भंडारी यांचे हस्ते कोरची तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महिला रसिकाबाई गावतुरे यांना शाल श्रीफळ देवून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट महिला बचत गट, व ग्रामसंघ यांना सुध्दा पुरस्कृत करण्यात आले. महिला बचत गटामार्फत तयार करण्यात आलेल्या वस्तुंचे प्रदर्शनी भरविण्यात आलेली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन कोरचीचे तहसिलदार छगणलाल भंडारी,अध्यक्ष म्हणुन जीवनज्योती महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष मालता राऊत,तर प्रमुख्य अतिथी म्हणुन पंचायत समिती कोरची चे सभापती श्रावणजी मातलाम, उपसभापती सुशिला जमकातन ग्रामपंचायत कोचीनारा चे सरपंच सुनिता मडावी, भ्रष्टाचार निर्मुलन , समितीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, नंदकिशोर वैरागडे, ग्रामपंचायत कोचीनारा येथिल सचिव दामोधर पटले, मुक्तीपथ संयोजिका निळा किन्नाके,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष राहुल अंबादे, तालुका व्यवस्थापक प्रमोद धुर्वे, संदीप नागदेवे, जसविंदर सहारे, लोमेश जोगे आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना तहसिलदार भंडारी यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातुन उदयोग उभारुन आपला विकास करावा असे मत व्यक्त केले, नंदकिशोर वैरागडे यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौणवनौपजाचे उत्पन्न होत असून यावर आधारीत प्रक्रिया उदयोग बचत गटाच्या माध्यमातुन उभारण्यात यावे असे मत व्यक्त केले. तर आशिष अग्रवाल यांनी मानवी जीवनात स्त्रीचे स्थान याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत कार्यन्वीत असलेल्या जीवनज्योती महिला प्रभाग संघाच्या वार्षिक पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन रत्नमाला सहारे, प्रास्ताविक अंजना बोगा तर आभार बबीता घावडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी वैशाली सहारे, विनोद टेंभुर्णे, सुधाकर हिडामी, कामेश्वरी देवांगण, पुष्पा सोनवाने यांनी परिश्रम घेतले.
,