भद्रावती : पोलिस स्टेशन माजरी अंतर्गत सन 2012 मध्ये यातील नमूद तीन आरोपी यांनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर महिलेचा विनयभंग करून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यावेळी फिर्यादी हिने पोलीस मांजरी येथे तक्रार दाखल केली त्यावरून पो स्टे माजरी येथे अप क्र.41/12 कलम 354,509,504,506, 323 ,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात करून आरोपी, नंदकिशोर मांढरे,दशरथ मांढरे,लक्ष्मन पचारे यांना अटक करून माजरी पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला आणि दोषारोपपत्र भद्रावती न्यायालयात दाखल केले, भद्रावती कोर्टाने आज रोजी सदर गुन्ह्यात आरोपी यांना दोषी ठरवले व तिन्ही आरोपी यांना कलम 354 भाद्वी मध्ये एक वर्ष सश्रम कारावास व पंधरा हजार दंड,दंड न भरल्यास सात दिवस साधा कारावास तसेच कलम 294,504,509 भादवि मध्ये एक महिना साधा कारावास व पाचशे रुपये प्रत्येक कलमान्वये दंड दंड न भरल्यास सात दिवस साधा कारावास अशी सजा झाली आहे.सरकारी अभियोक्ता म्हणून खंडाळकर यांनी काम पाहिले असून सदर गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक बाबुराव कुसले यांनी केला व कोर्ट पैरवी म्हणून हेड कॉन्स्टेबल राजकुमार उरकुडे यांनी काम पहिले .