राज्यशासनाची घोषणा
रवि शिंदे यांनी केले राज्यशासनाच्या निर्णयाचे स्वागत व मानले आभार
वरोरा :
पिककर्ज घेवुन कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांनी कालपरवाच केलेली होती, या मागणीच्या पार्श्वभुमीवर राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा मा. उपमुख्यमंत्री यांनी आज (दि.७) ला अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसरकार तर्फे कर्जमाफी ची घोषणा करुन नियमीत कर्जफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रु. पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देणार असल्याचे घोषीत करण्यात आले. याचा लाभ राज्यातील शेतक-यांना होणार असुन देशातील महाराष्ट्र हे शेतक-यांचे हितचिंतक म्हणुन पहिले राज्य ठरले असे रवि शिंदे यांनी म्हटले.
नियमित पिककर्ज भरणा करणा-या शेतक-यांना पन्नास हजाराची कर्ज माफी देण्यात येईल, अशी राज्यशासनाने यापूर्वी घोषणा केलेली होती. परंतु अद्यापही नियमीत पिककर्ज भरणा-या शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आलेली नव्हती. मात्र या विषयाला घेवुन रवि शिंदे यांनी पाठपुरावा सुरु केला होता. यावर राज्य सरकारच्या निर्णयाने शेतक-याचे हित जोपासत प्रामाणिक शेतक-यांना लाभ मिळवून दिला आहे.
शासन निर्णय क्रं. कृक्रमा ०१२०/प्र.क्र.-५/२ स, दि. १५ जानेवारी २०२० च्या संदर्भिय पत्रानुसार काढण्यात आलेल्या दि. ३ मार्च च्या कृषीपत ०८/मजोफुशेकय/उपसमिती/२०२२ या पत्रानुसार २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीनही वर्षामधे पिककर्ज घेवुन कर्जाची विहित मुदतीत परतफेड केलेली आहे, अशाच शेतक-यांची माहिती सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदींना मागविली आहे. या माहितीच्या आधारे पिककर्ज घेवुन कर्जाची विहित मुदतीत नियमितरीत्या परतफेड करणा-या शेतक-यांना पिक कर्ज रक्कम ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल. रवि शिंदे यांच्या मागणीला यश आले आहे. याकरीता रवि शिंदे यांनी राज्य शासनाचे आभार मानले असुन शेतकरी हितासाठी कार्य करीत राहील, अशी ग्वाही दिली.