कोरची
कोरचीतील लगान क्रिकेट ग्राउंडवर शिवतेज क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे शुभारंभ १४ फेब्रुवारीला झाले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यासह छत्तीसगढ राज्यतील सुद्धा अनेक गावातील एकूण २८ संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २५ संघानी स्पर्धेत हजेरी लावली असून मागील १४ दिवसापासून लगाण क्रिकेट ग्राऊंडमध्ये सामने सुरू होते. शिवतेज मंडळाकडून स्पर्धेतील विजेत्यांसाठी हजारो रुपये रोख रक्कम सोबत विविध आकर्षक बक्षिसे ठेवल्यामुळे खूप दूर-दूरच्या गावातील संघानी सहभाग घेतला होता.
छत्तीसगढ राज्यातील मोहला येथील केरला किंग्स संघ यांनी प्रथम क्रमांक पटकाविले असून कोरचीतील शिवतेज क्रिकेट संघानी द्वितीय क्रमांक तर राजनांदगाव येथील सय्याम क्रिकेट संघानी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
प्रथम क्रमांकावर येत असलेल्या संघासाठी कोरची शिवतेज क्रिकेट क्लब मंडळाकडून ३०,०००/- रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकावर येणाऱ्या संघासाठी कोरचीतील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारीकडून संयुक्तपणे २०,०००/- रुपये व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांकावर येणाऱ्या संघासाठी कोरची पोलीस स्टेशनकडून १०,०००/- रुपये व आकर्षक चषक तसेच मॅन ऑफ द मॅच सिरीज पासून अनेक प्रकारचे उत्कृष्ठ येणाऱ्यास प्रत्येकी १,००० -/ रुपये रोख रक्कमेसह आकर्षक चषक व मेडल ठेवण्यात आले होते.
सोमवारी दुपारी बक्षिस वितरणच्या कार्यक्रमात प्रथम क्रमांकावर येणाऱ्या केरला किंग्स संघ व द्वितीय क्रमांकावर येणाऱ्या शिवतेज क्रिकेट संघाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील राऊत,प्रमुख अतिथी राहुल अंबादे,डॉ. सुमित मंडल यांचे हस्ते तीस हजार रुपये व वीस हजार रुपये सह आकर्षक चषक देण्यात आले. यावेळी गौरव कावळे, प्रा. प्रदीप चापले, प्रा. रोटके,अनिल वाढई व शिवतेज क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते.
विशेष म्हणजे या पंधरा दिवसाच्या क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात सर्वाधिक मजेदार सामना सेमी फायनल क्रिकेटमध्ये केरला किंग्स संघ वर्षेस सय्याम क्रिकेट संघात बघण्यास मिळाले. या दोन्ही संघातील सामन्यात उत्कृष्ठ गोंलंदाज व फलनदाजी बघण्यास मिळाली दहा ओव्हर मध्ये ८३ धावे केरला संघानी काढली होती तर सय्याम संघानी शेवटच्या ओव्हर मधील २ धावे काढण्यास असमर्थ झाल्याने मोहलाचे केरला किंग्स संघाने विजय मिळविले. ही दोन्ही संघ छत्तीसगढ मधीलच होती.