नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पराभूत झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. यामध्ये प्राजक्त तनपुरे, संदीप वर्पे, बाळासाहेब थोरात, राणी लंके आणि राम शिंदे यांचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (ता.२९) शेवटचा दिवस असल्याने आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.