अहिल्यानगर :शिक्षण विभागाने विद्यार्थीचा ‘अपार आईडी’चा आदेश काढला आणि इयत्ता १ ते १२ वी पर्यंतचे सर्वच जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शिक्षक विद्यार्थी यांच्या पालकांचे आधार कार्ड गोळा करत अपार आईडी च्या कामाला लावले आहे.
शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये शिक्षण विद्यार्थ्यांची युनिक आयडी ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (एपीएआर) तयार करण्याचे काम शिक्षण विभागाने शिक्षकांवर सोपवले आहे. परंतु एपीएआरच्या कामालाही गती मिळत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आता दिवाळीनंतर शाळा सुरू झाली.
आता शिकवायचे तर कधी आणि इतर शालेय काम करायचे कधी असा प्रश्न गुरुजींना पडला आहे. एकीकडे शिक्षण विभागाचे अधिकारी अपार यांच्यावर लवकरात लवकर ओळखपत्र तयार करण्यासाठी दबाव आणत आहेत. दुसरीकडे, यू-डायसप्लस पोर्टलवर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे तपशील आणि पालकांचे आधार कार्ड तपशील जुळत नाहीत.
पालकाचे पोर्टलवर एक नाव तर आधारवर दुसरेच नाव -यू-डायसप्लस पोर्टलवर, शालेय विद्यार्थ्याचे नाव त्याचे मूळ नाव अशी नोंद आहे. परंतू बहुतेक विद्यार्थ्यांच्या नावापुढे आडनाव नसल्याने लावल्याने हा प्रकार घडत आहे. यू डायस प्लस पोर्टलवर पालक विद्यार्थ्याचे नाव एक आहे. मात्र आधार वर पालकाचे नाव बदलुन आहे. आडनाव जुळत नसल्याने अपार आयडीला आडकाठी येत आहे.
अपार आयडीच्या कामात गुरूजी व्यस्त –
यू-डायस पोर्टलवरून तयार केला जात आहे आयडी विद्यार्थ्याच्या पोर्टलवर प्रविष्ट केलेले तपशील जसे की नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख इ. आधार कार्ड प्रमाणेच असणे आवश्यक आहे आणि पालकांच्या आधार तपशीलासह देखील असणे आवश्यक आहे. अडचण अशी आहे की अनेक चुका सुधारण्यासाठी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे, परंतु माहितीच्या अभावामुळे ते अपूर्ण राहाते. अशातच साईड मेंटेनन्स मध्ये जाणे, सर्व्हर डाऊन असणे अश्या समस्यांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे.