तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी मुंबई आणि लातूर येथील अधिकृत एजन्सी काम करणार आहेत. पुरातत्त्व खात्याच्या निर्देशानुसार हे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.