मुलचेरा:तालुक्यातील शांतिग्राम येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन शनिवार (२८ सप्टेंबर) रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.
नेताजी युवा कबड्डी क्लब शांतिग्रामच्या वतीने भव्य खुले कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यातर्फे ३० हजार रुपयांचा प्रथम पारितोषिक, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्यातर्फे २० हजार रुपयांचा द्वितीय पारितोषिक आणि माजी प.स.सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्यातर्फे १० हजार रुपयांचा तृतीय पारितोषिक देण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी परिसरातील कबड्डी चमू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
दरम्यान या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शांतीग्राम येथे मंत्री आत्राम यांचे आगमन होताच गावकऱ्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. स्पर्धेचे उद्घाटन करून उपस्थित खेळाडूंना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शुभेच्छा दिले.त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत उदघाटनिय सामना रंगला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बबलू हकीम, कार्याध्यक्ष रियाज शेख, सरपंच अर्चना बैरागी,राकॉचे कार्यकर्ते कैलास कोरेत, उपसरपंच श्रीकांत समजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार,राजेश रंगुलवार, आदित्य घरामी, सपन डे, सत्यवान सिडाम, राजू सोनटक्के, गजू रामटेके, बालाजी सिडाम,अनिल सोयाम, ईश्वर उरेते तसेच शांती ग्राम येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.