मुलचेरा:- तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-01, लगाम अंतर्गत येणाऱ्या शांतिग्राम येथे दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोज शनिवार ला “रेबिज मुक्त भारत” अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
दरवर्षी 28 सप्टेंबर ला जागतिक रेबिज दिन साजरा केला जातो. जागतिक रेबिज दिनाचं औचित्य साधून शांतिग्राम येथील प्राणी प्रेमी, श्वान प्रेमी तसेच प्रतिष्टित गावकऱ्यांना रेबिज आजाराचे लक्षणे, प्रादुर्भाव व त्यावरील उपयोजना, प्रतिबंधात्मक लसीकरण बाबत माहिती देण्यात आली. सदर अभियान दरम्यान शांतिग्राम येथिल घरो-घरी जाऊन मोफत रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
“रेबिज मुक्त भारत” अभियान शांतिग्राम येथे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली राजपत्रीत पशुधन विकास अधिकारी डॉ. चेतन अलोणे यांनी राबविले. या क्षणी गावातील सरपंच अर्चनाजी बैरागी तसेच सदस्यगण, पशुसंवर्धन विभागाचे परमेश्वरजी राठोड, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्षणी गावातील अनेक श्वान प्रेमी यांनी सदर अभियानाचा लाभ घेत प्रतिबंधनात्मक लसीकरण करवून घेतले. याचवेळी डॉ.चेतन अलोणे यांनी रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचेही आवाहन केले.