सिरोंचा:देशातील विविध जाती-धर्मातील, प्रांतातील आणि भाषिक नागरिकांना एकसंधपणे घट्ट बांधून ठेवणारा पवित्र ग्रंथ म्हणजे आपले भारतीय संविधान. प्रत्येक भारतीयाला संविधानाची किमान माहिती असायलाच हवी. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत संविधान पोहोचवणे गरजेचे आहे. देशवासीयांना एकत्र ठेवणारा ग्रंथ म्हणजे संविधान आहे,असे प्रतिपादन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते रविवार (29 सप्टेंबर) रोजी सिरोंचा तालुका मुख्यालयात आयोजित भारतीय संविधानाची गौरवगाथा या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,ऍड मेंगनवार,सिरोंचा तालुका अध्यक्ष मधूकर कोल्लुरी,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपलीवार,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवली, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कृष्णमूर्ती रिकुला, नगर सेवक सतीश भोगे,नगर सेवक जगदीश रालबंडीवार,नगर सेवक सतीश राचर्लावार,फाजील पाशा, शिवसेना तालुकाध्यक्ष शिंदेगट नस्कुरी,मदनय्या मादेशी,सत्यन्ना चिलकमारी,संजू पेद्दापल्ली,रमजान खान,ओमप्रकाश ताडीकोंडावार,रवि सुलतान,शेलार सय्यद,जुगनू शेख,शुभम कुम्मरी, रमेश मानेम,आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मागील दिवसांपासून विरोधकांकडून संविधान बदलवणार असल्याचे अफवा पसरविले जात आहे.देशाच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना विधिवतपणे स्वीकारली गेली. त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. भारतीय राज्यघटनेत सर्व वर्गाचे हित लक्षात घेऊन विस्तृत तरतुदींचा समावेश आहे.संविधान बदलाविनाऱ्याचा जन्म अजून झाला नाही त्यामुळे नागरिकांनी अश्या अफवांना बळी पडू नये,असे आवाहन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
दरम्यान अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी खास भिम प्रेमी,शिव प्रेमी तसेच बिरसा मुंडा व विर बाबुराव शेडमाके यांच्या अनुयायांकरिता ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा’ We The People संगीतमय महानाट्यातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन भारतीय संविधानाची प्रत वाटप करण्यात येत आहे. नुकतेच 28 सप्टेंबर रोजी अहेरी येथील वासवी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी सिरोंचा तालुका मुख्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.