गोंडपिपरी :- तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे बैल पोळा आणि तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जगाचा पोशिंदा असलेल्या बैलांची वर्षभराच्या कष्टानंतर पूजा करून त्यांचा सन्मान करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. तांत्रिक युगात बैलांचे महत्व कायम राहावे, यासाठी हा सण साजरा केला जातो, आणि पर्यावरण संतुलित राहण्याचा संदेश देण्यासाठी तान्हा पोळाही आनंदात साजरा होतो.
ग्राम पंचायत आणि काही समाजाभिमुख प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकाराने महादेव मंदिरात बैल पोळा व तान्हा पोळा मोठ्या जल्लोषात पार पडला. समाजकार्यात अग्रगण्य आणि धार्मिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी बैल पोळा निमित्ताने आलेल्या शेतकऱ्यांचा दुपट्टे देऊन सन्मान केला. तसेच तान्हा पोळ्यात सहभागी बालगोपालांना जियोमेट्री बॉक्स देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात ग्राम पंचायत सरपंच लक्ष्मी बालूगवार, उपसरपंच सूनिल घाबर्डे, राकेश कटकमवार, मारोती अम्मावार, संजय गोविंदवार, देवस्थान कमिटी अध्यक्ष अजय पेरकावार, विजय पेरकावार, नयन रामगोनवार, मधुकर गूरणूले, देवराव चौधरी, नितिन कोल्हापूरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती आदे, सदस्य समीर माडूरवार, संस्कार बोडलावार, अजित कुद्रपवार, भानेश येग्गेवार, मारोती गूडमेट्लावार, मनोज शिडाम, तंमूसचे सर्व सदस्य, ग्राम पंचायत सदस्य आणि देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.