वैजापूर :- तालुक्यातील जरूर या गावांमध्ये १८ वर्षीय तरुणीचा विहिरीमध्ये पाय घसरून मृत्यू झाला.१६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. पूजा बाबासाहेब मतसागर (१८) जरूळ येथील तरुणीचे नाव आहे. जरूर शहरातील गट नंबर (९६) मधील विहिरीवर पाणी आणायला गेली होती. पाणी उडत असताना तिचा पाय घसरून विहिरीत पडली व तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नातेवाईकांनी तिला विहिरीतून काढून उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे आणले असता. डॉ. यांनी तिला मृत्य घोषित केले. याप्रकरणी पोलीस पाटील अनिता सूर्यवंशी यांनी माहिती दिली यानुसार वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मूर्तीची नोंद झाली. पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष पवार करीत आहे.