मूल प्रतिनिधी :- mवनपरिक्षेत्र चिचपल्ली अंतर्गत उपवनपरीक्षेत्र केलझर वनक्षेत्र कक्ष क्रमांक 431 मध्ये केलझर येथीलच गुराखी वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना आज सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मुल तालुक्या अंतर्गत येणाऱ्या केलझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 58 वर्ष हे नेहमी प्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगलात गुरे घेऊन गेले असता काल पासून घरी परतले नाही. घरच्यांनी चिंता करीत वनविभागात याबाबत सूचना दिले दरम्यान वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी येलमे, उपवन परिक्षेत्र अधिकारी पळवे आदी वणपाल तथा वन विभागाचे कर्मचारी ची चमू जंगल शोध मोहीम सुरू केली काल काहीच थांग पता लागला नाही. म्हणून दिवस उजलतच पुन्हा वनविभागाची चमू काही नातलागासह वणात शोध घेतले असता 4 ते 5 किमी अंतरावर गुराखी गणपत लक्षण मराठे यांचं प्रेत आढळून आला तेव्हा त्यांना वाघाने ठार केल्याचे निदर्शनास आले. याची सूचना घरच्यांना देत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी मुल शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. याचा तपास वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून पोलिस प्रशासनही सोबत होते.दिवसेंदिवस वाघाच्या हल्यात नागरिकांच्या जीव जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या असून वन विभागाने तात्काळ उपाय करावा व मृत्काच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकात होत आहे.