अहेरी:शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,सांस्कृतीक कार्यात राज्यात आपली वेगळी ओळख तयार करून गडचिरोली जिल्ह्यासह अनेक भागात आपल्या कार्याने ठसा उमटविणाऱ्या अहेरी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ शाहीन जमीर हकीम उर्फ भाभी जी यांचा आज वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम सौ.शाहीन हकीम यांच्या जन्मदिनाच्या निमित्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात सर्वच विभागात रुगांना फळ,बिस्कीट वाटप करण्यात आले. सौ.शाहीन व जमीर हकीम यांची ज्येष्ठ कन्या डॉ लुबना गजल व जावई प्राध्यापक सरफराज आलम यांच्या नेतृत्वात फळवाटप कार्यक्रम साजरा झाला.
यानंतर अहेरी जवळील इंदाराम येथील भगवंतराव हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांना बुक,पेन आणि वह्या चे वाटप करण्यात आले.तसेच वाढदिवसाची आठवण सदैव राहावी आणि निसर्गाला ही काही देणे द्यावे या साठी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी वन वैभव शिक्षण मंडळचे ज्येष्ठ कर्मचारी मुक्तदिर शेख,नफी पठाण,ग्यानकुमारी कौशी,सरला मुळावार,सुवर्णा पुसालवार,जरीना शेख,तजिना शेख,मायाताई सुनतकर,मंगला मुंगमोडे,प्राध्यापक मुंगमोडे,समृद्धी चीमरालवार,जयश्री चीलवेलवार,सुवर्णा दहागावकर यांच्या सह इंदाराम येथील भगवंतराव हायस्कूल चे कर्मचारी एम.वी. मामिडालवार,आर.एच.गोबाडे, व्ही.आर.गऊकर,एस.आर.मध्येर्ला,कु.एम.चांदेकर मॅडम,कू.एस.एस. संगीडवारमॅडम,पी.एस.भोंगळे,पी.एस.नीलम आदी उपस्थित होते.दरवर्षी सौ.शाहीन भाभी यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा होत असतो.