भद्रावती :- शहरालगत असलेल्या लोणारा गावात स्मशानभूमीच नसल्यामुळे येथील गावकऱ्यांना नाईलाजाने हायवेच्या कडेला प्रेतावरील अंत्यविधी पार पाडावा लागत आहे . येथील स्मशानभूमी करिता 2014 ला जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीतर्फे येथे स्मशानभूमीचे काम अद्याप पर्यंत करण्यात आले नाही. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता भद्रावती आम आदमी पक्षातर्फे 22 जुलै रोज सोमवारला सुरज शहा आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यांचे नेतृत्वात शहरातील गांधी चौकातून पंचायत समिती कार्यालयावर पुतळ्याची प्रतीकात्मक शवयात्रा काढण्यात आली व गटविकास अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले .
स्मशानभूमी बांधकामा संदर्भात लोणारा ग्रामपंचायतीकडून आपल्या कार्यालयाला आजपर्यंत कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे यावेळी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. या संदर्भात कार्यालयाला प्रस्ताव प्राप्त झाल्यास यासंदर्भात असलेली लोणारा गावकऱ्यांची समस्या निकालात काढण्यात येईल असे आश्वासनही यावेळी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी सदर आंदोलनकर्यांना दिले.यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, जिल्हा संघटन मंत्री भीमराज सोनी, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष दीपक बारशेट्टीवार, महानगर महिला अध्यक्ष . तब्बसूम शेख, आसिफ हुसेन शेख, रोहन गाज्जेवार, अनुप तेलतुंबडे, मीडिया प्रभारी प्रशांत रामटेके, सॅम्युअल गंधम, राजकुमार चट्टे, सुरज खंगार, अमित कसारे, सतिष कुथे, वैभव तंकाडे, शुभम गंडलेवार, सुनील खोंडे, अविनाश निखाडे, विजय आत्राम, मनोज पारखी, लक्ष्मण देवतळे, स्वप्निल पारखी, दिनेश गोचे, विजय राजूरकर, केतन पारखी, शंकर गोचे, कार्तिक नागपुरे, गोकुळ गोचे, सुरज वासेकर, मनीष पारखी, स्वप्निल ढुमणे, रवींद्र सोयाम, श्रीकांत पायपरे, सचिन डाहुले, आकाश आत्राम, प्रतीक पायपरे, निखिल गोचे, विवेक पिंपळे, प्रवीण राजूरकर, आविश पारखी, समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.