गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील वढोली ही तालुक्यात संत नगरी म्हणून ओळखल्या जाते. गावात मोठया प्रमाणात सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तालुक्यात या गावची ओडख संतनगरी अशी आहे.मात्र आता तीच संत नगरी समस्या नगरी बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
येथील अनेक सार्वजनिक नाल्या साफ नसल्याने गावात अनेक ठिकाणी पाणी साचले आले गावातील मुख्य रस्त्यावरून पाणी ओसंडुन वाहत आहे.मोठ्या प्रमाणात जागोजागी पाणी साचले आहे.गावातील वढोली – बोरगाव मुख्य मार्गाची अनेक वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे रस्ता मंजूर नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमानात गिटी निघाली आहे जागोजागी खड्डे पडले आहे.पावसामुळे हा मार्ग चीखलमय झाला असून वाहनचालकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे.नाल्या साफ नसल्याने गावातील रस्तावरून पाणी मोठ्या प्रमाणात ओसंडुन वाहत आहे.गावातील या प्रकारावर नागरिकांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.
वढोली – बोरगाव मार्गाची अवस्था अंत्यंत खराब आहे.पायदळ चालणे देखील कठीण झाले आहे.ग्रामपंचायतने पाठपुरावा करावा आमदारांनी लक्ष घालून नवीन रस्ता मंजुरी साठी प्रयत्न करावे.
– सुरज माडूरवार
– तालुका प्रमुख शिवसेना
– गोंडपिपरी