मूल प्रतिनिधी
दिनांक 1 जुलै रोज सोमवरला व्हाईस ऑफ मीडिया च्या वतीने मूल तालुक्यातील तालुका कृषी कार्यालय अंतर्गत बातम्या प्रकाशित होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक मुल यांना निवेदन दिले असल्याने या घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तहसीलदार यांच्याशी या विषयावर सविस्तर सांगपांग अशी चर्चा करण्यात आली. चर्चेला उत्तर देताना संबंधित कार्यालय व त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून न्याय दिला जाईल अस आश्वासन पत्रकारांच्या शिष्टमंडळांला तहसीलदार मुल यांनी दिले.
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, जिल्हा कार्याध्यक्ष गुरुभाऊ गुरनुले, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, मूल कार्याध्यक्ष शशिकांत गणवीर, सदस्य रोहित कामडे,प्रशांत मेश्राम, गौरव शामकुळे आदी उपस्थित होते.