गोंडपिपरी –
पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री यांनी महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना आनली असुर दर महीना महिलांना १५०० रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. मात्र याकरीता १५ जुलै ही ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख आहे.
सध्या सर्वत्र शेतीचा हंगाम सुरु आहे.अश्या स्थितीत सामान्य जनता शेतात पेरणीकरीता व्यस्त आहे.मात्र या योजनेच्या निमित्याने महिला रोजी रोटी सोडून या योजनेचा लाभ मिळवण्याच्या कामाला लागल्या आहेत.अश्या स्थितीत महाराट्र शासनाने दिलेली ही वेळ मर्यादा अपुरी पडत असुर लाडकी बहिण योजनेच्या कालावधीत वाढ करावी.सोबतच जन्म दाखला नोंदी अनेक गावात उपलब्ध नसून तालुकास्तरावर देखील उपलब्ध नाही त्यामुळे ही जाचक अट रद्द करावी किंव्हा ग्रामपंचायत कडे तालुकास्तरावरील नोंदी हस्तांतर करावे तसेच लाभार्थ्यांना कागदपत्रे तातडीने कागदपत्रे उपलब्ध करून देयासाठी प्रशासनाने ग्रामपंचायात स्तरावर स्वतंत्र यंत्रणा उभारुन सहकार्य करावे.सोबतच संबंधीत दाखल्यासाठी सेतू केंद्राकडून अतिरक्ति शूल्क आकारणाऱ्यावर त्वरीत कार्यवाही करन्यात यावी.अशी मागणी दि( २) मंगळवारी तहसीलदार शुभम बहाकर यांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे
निवेदनातून केली आहे.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार, काँगेस तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष देविदास सातपुते,शहर अध्यक्ष राजू झाडे,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,शहर प्रमुख विवेक राणा,काँग्रेस तालुकाउपाध्यक्ष नीतेश मेश्राम,युवक तालुका अध्यक्ष नरेश तूमडे,प्रशांत कोसणकर यांची उपस्थिती होती .