गोंडपिपरी (सुरज माडुरवार)
आपला प्रत्येकाचा जन्म महान कार्यासाठी झालेला आहे. कोणतेही काम जीव ओतून करा. यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत रहावे. विश्वास स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तुत्वावर ठेवावा. तेवढेच नाही तर विद्यार्थ्यांनी स्वप्नावर विश्वास ठेवून भविष्य घडवावे असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे बोलत होते.
खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळ गोंडपिपरी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन खैरे कुणबी सभागृहात रविवार करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानी आमदार सुभाष धोटे,अध्यक्षस्थानी डॉ. विजय देवतळे उपस्थित होते.तालुक्यातील सर्व गुणवत्ता प्राप्त दहावी व बारावीमधील साठ विद्यार्थ्यांचा सत्कार व पस्तीस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान तसेच शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ संपन्न झाला.यवेडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, दीपक सातपुते, कांग्रेस जिल्हाउपाध्यक्ष देवेंद्र बट्टे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, व्यसनमुक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष गणपत चौधरी,ओबीसी कृती समितीचे तालुकाध्यक्ष मोरेश्वर सुरकर,निलेश पुलगमकर, अशोक रेचनकर, वनिता वाघाडे,,रंजना रामगिरकर,अनिल झाडे, नामदेव सांगळे, दिनकर ठोंबरे, सोनी दिवसे उपस्थीत होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरूण झगडकर यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. सुत्रसंचालन प्रा. रमेश हूलके तर आभार आकाश झाडे यांनी मानले. दिवसभर चाललेल्या भव्यदिव्य कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रत्नाकर चौधरी, विजय बट्टे, डॉ. अशोक कुळे, गुरूदेव बाबनवाडे, किशोर भोयर, गुणवंत कुबडे, झुंगाजी कोरडे, देवानंद रामगिरकर, अमोल पाल, विजय झाडे यांनी अथक परिश्रम घेतले