वरोरा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
वरोरा :- शहरालगत असलेल्या आनंदवन येथे बुधवारला एका विवाहित तरुणीची धारदार शस्त्राने हत्या झाली होती . त्या आरोपाखाली आनंदवन येथील समाधान माळी (२६) याला अटक करण्यात आली त्यानंतर न्यायालयाने ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आरोपी पोलीस कस्तदितया आरोपीने आज (३० जून ) ला पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्येच आज सकाळी 8:30 च्या दरम्यान बुटाच्या लेस ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे , आरोपी 4 जुलै पर्यंत 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत होता. आरती चंद्रवंशी या तरुणीचा बुधवारी घरात शिरून आरोपीने हत्या केली होती. प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून झाल्याचा संशय होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधानला गुरुवारी संध्याकाळी अटक केली होती. आरोपीने लॉकअप मध्ये आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा उपविभागीय अधिकारी तथा वरोरा तहसीलदार, देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. या आत्महत्या प्रकरणातील बरेच प्रश्न अनुत्तरीत असून या घटनेचा तपास पुढील यंत्रणा करीत आहे.