कार्यकर्त्यांच्या संतप्त भावनांनी राजीनामे घेऊन धरली ‘मातोश्री’ची वाट
शिंदेंना पदावरून पायउतार करा अन्यथा लढाई आरपारची लढू पदाधिकारी निर्णयावर ठाम
गोंडपिपरी (सुरज माडूरवार)
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात दोन जिल्हा प्रमुख असताना उपजिल्हा प्रमुख असलेले रवींद्र शिंदे यांच्या रूपाने तिसरा जिल्हा प्रमुख देऊन विद्यमान जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे ,मुकेश जीवतोड यांचे कार्यक्षेत्र बदलल्याने शिवसेना उबाठामध्ये मोठा राजकीय भूकंप आला असल्याचे चित्र एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिसत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत संदीप गीऱ्हे यांचा प्रवास थक्क करणारा आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन जिह्यात मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इंनकमींग होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत गुवाहाटीला जाऊन बंड करत शिवसेना फोडली त्यावेळी जिल्हाप्रमुखांना खोक्यांसह अनेक आमिष दाखवण्यात आले परंतु कुठल्याही आमिषाला बळी न पडता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेत शिंदेंनी केलेल्या बंडाचा निषेध चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आला.गरीब,कष्टकरी, मागासवर्गीय जनतेच्या , युवकांच्या प्रश्नांना घेऊन शेकडो आंदोलने करत न्याय मिळवून देण्यात संदीप गीऱ्हे यांची भूमिका जिल्ह्यात महत्वाची राहिली आहे.अशातच जिल्ह्यात नगरपंचायत सह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळाले.त्या दृष्टिकोनातून तीनही विधानसभेत
गीऱ्हे उत्तम काम करताना दिसत असताना अचानक सामनातून तिसऱ्या जिल्हाप्रमुखाची गुरुवारी निवड जाहीर करण्यात आली.दरम्यान जाहीर झालेल्या रवींद्र शिंदे यांच्या नियुक्तीच्या निर्णयाविरोधात मातोश्री समोर दोन्ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्यातील जवळपास दोनसे नाराज शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करन्यासाठी राजीनामे घेऊन मातोश्रीची वाट धरली आहे.
शिवसेना उबाठामध्ये विधानसभा निहाय विचार केला तर संदीप गिऱ्हे यांच्याकडे चंद्रपूर बल्लारपूर व राजुरा हें विधानसभा क्षेत्र होते तर मुकेश जीवतोडे यांच्याकडे वरोरा चिमूर आणि ब्रम्हपुरी हें विधानसभा क्षेत्र होते, मात्र मुकेश जीवतोडे यांना वरोरा विधानसभा निवडणूक लढायची आहे आणि तशी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली असतांना त्यांनाच वरोरा विधानसभा क्षेत्रातून बाहेर केल्याने त्यांच्यासह त्यांच्या समर्थक शिवसैनिकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, शिवाय संदीप गिऱ्हे यांचे कार्यालय व वास्तव्य चंद्रपुरात असल्याने गीऱ्हे यांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्र सोडावे लागतं असल्याने त्याच्यासाह त्यांचे समर्थक शिवसैनिक कामालीचे नाराज आहे, पक्षांच काम करत असतांना अनेक पोलीस केसेस अंगावर घेणाऱ्या खऱ्या शिवसैनिकांना डावलून बाहेरून आलेल्यांना गोंजाळलेजात असल्याची भावना जुन्या शिवसैनिकांनी बोलून दाखवली आहे.
शिवसेना उबाठा संपर्कप्रमुख प्रशांत कदम व विदर्भाचे संपर्क नेते भास्कर जाधव यांना माहिती न करता परस्पर रवींद्र शिंदे यांना जिल्हा प्रमुख पद का देण्यात आले आणि त्यातही दोन जिल्हा प्रमुखांचे स्वतःचे वास्तव असणाऱ्या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व बदल का करण्यात आले हें प्रश्न घेऊन मुंबईच्या मातोश्री समोर शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन होणार असून शिवसेना ‘उबाठा’ गटातील उलथापालथीवर कार्यकर्ते भडकलेले दिसत आहे.मुंबईतून आलेला ‘तो’ निर्णय शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला असून कार्यकर्त्यांच्या संतप्त भावनांनी ‘मातोश्री’ची वाट धरली असून उद्धव ठाकरे काय निर्णय देणार याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उद्धव साहेब आदेश देतील तर पद सोडायला तय्यार…- संदीप गीऱ्हे
शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख जिल्हाप्रमुख असा माझा प्रवास राहिला आहे परंतु ज्या चंद्रपूरात माझं वास्तव्य आहे माझं जिल्हा कार्यालय आहे जिथे मी शिवसैनिकांना जिल्ह्यातील न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्याच माझ्या होम ग्राउंड चंद्रपुरातील चंद्रपूर विधानसभेची जवाबदारी ही चार पक्ष फिरून आलेल्या रवींद्र शिंदे यांच्याकडे दिल्याने नाराज झालो आहे.नेमकी आमची चूक काय हे उद्धव साहेबांना विचारायला आम्ही मुंबई गाठत आहों.साहेबांनी आदेश दिला तर सर्व पदे सोडून सामान्य शिवसैनिक म्हणून काम करायला तयार आहे.