गोंडपिपरी :- दि. १६ जून रोजी गोंडपिपरी येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भव्य महाआरोग्य शिबीर (मोफत रोगनिदान, उपचार व शस्त्रक्रिया) संपन्न झाले.
या शिबीराचा गोंडपिपरी तालुका परीसरातील १४२७ नागरीकांनी लाभ घेतला; त्यापैकी ५१५ रूग्ण विविध शस्त्रक्रियांसाठी पात्र ठरले. या पात्र रुग्णांवर आजपासून सावंगी (मेघे) येथे विविध शस्त्रक्रिया पार पडणार आहेत. त्याकरिता काल (दि. २७) सकाळी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय गोंडपिपरी येथून ७६ रुग्णांची दुसरी तुकडी शस्त्रक्रियेसाठी रवाना झाली.
यावेळी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, शहराध्यक्ष चेतन गौर, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, नगरसेवक राकेश पुण, संजय झाडे, शिथील लोणारे, बंडू बोनगीरवार, प्रवीण धोडरे, प्रकाश रापलवार, रमेश दिंगलवार, मनोज वनकर, गणेश मेरुगवार, राहुल चौधरी, गणेश डहाळे, सुरेखा श्रीकोंडावार, अरुणा जांभूळकर, मायाबाई वाघाडे, नगरसेविका अश्विनी तोडासे, पंकज चिलनकर, वैभव बोनगिरवार, प्रज्वल बोबाटे आदिंनी उपस्थित राहून रुग्णांना बसने रवाना करीत यशस्वी शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या.