घुग्घुस : येथील माजी जनरल सेक्रेटरी एसकेएमएस (एआयटी
युसी) युनियनचे माजी श्रमिक कामगार नेते नरेंद्र चंद्रय्या नुने यांनी वेकोलिचे उपक्षेत्रीय प्रबंधक यांना निवेदन देत वेकोलि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांकरिता असलेल्या बस थांब्याचे शेड बनविण्याची मागणी केली होती.
वेकोलि वसाहतीच्या युको बँक, इंदिरानगर, सुभाषनगर, रामनगर, बंगाली कॅम्प याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांकरिता बस थांब्याचे शेड आहे. शेड खराब अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांना उन्हात व पावसात उभे राहावे लागते. ही समस्या लक्षात घेत निवेदनातून मागणी करण्यात आली होती.
निवेदन देऊन एका वर्षाचा कालावधी होऊन गेला परंतु बस थांब्याचे शेड बनविण्यात आले नाही. परंतु काही काँग्रेस नेते बस शेडच्या कंत्राटाबद्दल गुप्त माहिती मिळविण्यासाठी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी श्रमिक कामगार नेते नरेंद्र चंद्रय्या नुने यांनी केला आहे.