मुल : बसस्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून त्यात शाळा कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी,विद्यार्थीनी आणी ग्रामीण भागातील महिला भगिनी, शासकीय महिला कर्मचारी यांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
बरेचदा वेळेवर येणाऱ्या समस्यामुळे वेळेवर बस उपलब्ध झाली नाही तर घरी जाण्यासाठी रात्र झाली तर महिला भगिनींना उशिरापर्यंत बसस्थानकावर राहावे लागते.या संधीचा फायदा घेत अनेकदा टवाळखोर पोरांकडून विद्यार्थिनी महिलांना छेडण्याचा प्रकार होत असतो. यामुळे त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन न्यूनगंड तयार होण्याची भीती आहे.. हा प्रकार रात्रच नाही तर दिवसाढवळ्या सुद्धा अनेकदा मूल बसस्थानकावर झालेला आहे.तसेच मूल बसस्थानकावरून अनेकदा प्रवाशांचे पॅकेट मारले गेले आहे.बस स्थानकावर टू व्हीलर ठेवणाऱ्या अनेक प्रवाशांच्या टू व्हीलर सुद्धा चोरीला गेलेल्या आहेत.
सर्व बाबीचा विचार करता मूल बस स्थानकावर स्वतंत्र पोलीस चौकी उभारत महिला पोलीस शिपायांसह पोलीस शिपाई यांची नियुक्ती करून महिलांना विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आधार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश येसनकर यांनी चंद्रपूर जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांची उपस्थिती.
यावेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तात्काळ मुल पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागून पोलीस चौकी सुरु करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले.