वरोरा :- प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आ.बच्चू कडू यांच्या सकल्पनेतून 31 मे ते 26 जुन महाराष्ट्रभर रक्तदान शिबीर राबविण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्ष वरोरा यांनी हे शिबीर माढेळी येथील शेतकरी भवन येथे घेतले त्यात एकूण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आ. बच्चू कडू यांचे रुग्णसेवेत महाराष्ट्रभर खूप मोठ काम आहे. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका झाल्याबरोबर त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेता. “आता झाले मतदान भरल्या मतपेट्या, आता करूया रक्तदान, कारण रिकाम्या आहेत रक्तपेट्या…” असा नारा देत महाराष्ट्रात ठीक ठिकाणी रक्तदान शिबीर राबविण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रमुख शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख अमोल काटकर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर पार पडले या रक्तदान शिबिरात ग्रामपंचायत माढेळी चे सरपंच देवानंद महाजन, उपसरपंच वनिता हुलके यांची उपस्थिती होती . या शिबिरासाठी अमन रक्तपेटी नागपूर यांची चमू होती तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती.