वर्धा : – भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक न्याय,समताधिष्ठीत बंधुभावपुर्ण समाज निर्मितीसाठी समता युक्त शोषण मुक्त समाज हाच आमचा ध्यास हे धेय्य घेवून कार्यरत विवेक विचार मंच भारतीय संविधान व विविध वैचारिक विषयात लोकजागृती करुन संविधानीक मुल्यांची रुजवणुक व सामाजिक बंधुभाव जोपासला जावा या उद्देशाने कार्य करीत आहे.राज्यात जातीय अन्याय, अत्याचार व सामाजिक तणावाच्या घटना तसेच समस्यांमध्ये सामाजिक न्यायाच्या भूमिकेतुन मंच सक्रीय आहे.
विवेक विचार मंच व सहयोगी संस्थांच्या वतीने राजर्षी छात्रपती शाहु महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन राज्यातील विविध शहरात केले जाते यावर्षी परिषदेचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट मुंबई येथे केले आहे.मा.मुख्यमंत्री व सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य ना.एकनाथ शिंदे व किशोर मकवाना अध्यक्ष राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग, भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
सामाजिक न्याय व समतेच्या विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ता यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यातुन इतरांनाही प्रेरणा मिळावी या हेतुने विवेक विचार मंच सामाजिक न्याय परिषदेत “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार’ सन्मानाने गौरव करते, यंदा विदर्भातील मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ता फकीराजी सुदाम खडसे व जिव्हाळा सामाजिक संस्था नागपुरचे मनीष मेश्राम यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आपण या परिषदेत उपस्थित राहावे व सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी विवेक विचार मंच चे विदर्भ प्रांत संयोजक सुनील किटकरु यांनी केले.
राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद रविवार दिनांक 23 जुन 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत राहिल.
सदर परिषदेची माहिती विश्राम भवन,वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना विवेक विचार मंच चे विदर्भ प्रांत संयोजक सुनील किटकरु यांनी दिली, याप्रसंगी मंच चे वर्धा जिल्हा संयोजक राहुल मुन,प्रांत समन्वयक अतुल शेंडे,नगर संयोजक वामनराव वागदे,प्रचार प्रमुख प्रशांत अवचट, वैभव वागदे, उमेश जावडीया आदि कार्यकर्ता उपस्थित होते.