गडचिरोली:- भामरागड तालुका मुख्यालयात सुरू असलेल्या रेती तस्करी वर ‘सह्याद्रीचा राखणदार’ने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही अवैध रेती उत्खनन;वनविभागाच्या हद्दीत रेतीचे ढिगारे कोणाचे ? या अशयावर वृत्त प्रकाशित करताच भामरागडात एकच खळबळ उडाली आहे.
भामरागड वनपरिक्षेत्र हद्दीतील जंगल परिसरात रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली आहे. ताडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या हेमलकसा उपक्षेत्रात नुकतेच काही दिवसापूर्वी उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने यांनी धडक कारवाई केल्यावर आता येथील रेती तस्करांनी भामरागड वनपरिक्षेत्रात आपला मोर्चा वळविला आहे.येथील पर्लकोटा नदीतून रेती उपसा करून काही जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली आहे.वृत्त प्रकाशित होताच येथील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून कारवाईचे संकेत मिळताच रेती तस्करांची रात्रभर धडपड सुरू होती.
भामरागड तालुक्यातील ताडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या हेमलकसा उपक्षेत्रातील अवैध रेती साठ्यावर उप विभागीय अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. जंगल परिसरात एवढे मोठे अवैध रेतीचे साठे असताना महसूल आणि वन विभागाला माहिती कशी नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे आता या रेती साठ्यावर येथील स्थानिक महसूल आणि वन विभागाचे अधिकारी कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
——————————————————————-
नुकतेच काही दिवसापूर्वी हेमलकसा जवळ मोठी कारवाई करण्यात आली.भामरागड वनपरिक्षेत्र हद्दीतील अवैध रेती साठा बाबत येथील वनपरिक्षेत्राधिकार्यांकडून माहिती घेऊन कारवाई केली जाणार.
-अशोक पवार, उपविभागीय वन अधिकारी, भामरागड