गोंडपिपरी –
करंजी येथील गुरुदेव राईस मिलच्या मागील बाजूस अवैधरित्या दारूचा साठा ठेवून दारू विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती गोंडपिपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना मिळाली.लागलीच गोंडपिपरी पोलिसांनी राईस मिलची पाहणी केली असता राईस मिलच्या मागच्या बाजूला एका लाकडी आलमारीमध्ये अवैध दारुसाठा सापडला. त्याची एकूण किंमत १८,६२५ रूपये आहे.
सदर माल हा अवैध्यरित्या सापडल्याने गोंडपिपरी पोलिसांनी दि 28 गुरुवारी सायंकाडी 6 वाजता दरम्यान माजी पंचायत समिती उपसभापती तुकेश वानोडे यांच्यावर गुन्हा नोद केला.
सदर कारवाई उपविभागिय पोलीस अधिकारी भगत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदारं रमेश हत्तीगोटे,पो. हवा. सुरपाम,कोवे ,नासीर,पवार, अनिता, कोसणशिले,मडावी यांनी केली आहे.