गोंडपिपरी -(सुरज माडूरवार)
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. कुलथा येथे दोन नद्यांचा संगम असून मोठ्या प्रमाणात नदीवर आंघोळ करण्यासाठी नागरिकांची गर्दी असते अशातच आज दि ९ शनिवारी दुपारी एक वाजता दरम्यान आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा हनुमान मंदिर येथे सर्व धर्म समभावाचे दर्शन पाहायला मिळते.हनुमानजींच्या मूर्तीचे दर्शन घेणारे हजारो भक्त शिवरात्री,आषाढी एकादशीनिमित्त कुलथा यात्रा महोत्सवाला येतात हजारो भक्त दर्शनासाठी धार्मिक भावनेतून रांग लावतात.यावेळी हनुमानजीची मूर्ती त्यांचे दुःख दूर करतात हा तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचा आत्मविश्वास आहे.
कुलथा हे गाव गोंडपिपरी – मूल मार्गावर वढोली येथून उजवीकडे ४ कि. मी अंतरावर आहे.अंधारी व वैनगंगा ह्या दोन्ही नद्यांच्या मधोमध वसलेले कुलथा गाव आहे.
महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत असते. दि.७ गुरुवार पासून यात्रा महोत्सवाला सूरवात झाली असून ही यात्रा १२ तारखेपर्यंत असते तालुक्यातील धानापुर येथील मृतक आकाश अशोक शेडमाके वय २३ ,गणेश मरसकोले,सोमनाथ गेडाम दोघेही राहणार धाणापुर व तन्मय मडावी (भामरागड जी गडचिरोली) चौघे मित्र यात्रेत आल्यानंतर नदी पात्रात फार पाणी नसल्याने मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर अंघोळीला गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने आकाश अशोक शेडमाके वय २३ हा पाण्यात बुळुन बेपत्ता झाला होता.घटनास्थळी गोंडपिंपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पिएसआय मोगरे दाखल होऊन बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली तब्बल दोन तासानंतर अडिज वाजता मृतदेह सापडला.घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.