गोंडपिपरी :-
ईव्हीएम या मशीनचा सत्ताधारी पक्षाकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करून गोंडपिपरी तालुक्यातील ओबीसी कृती समिती,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,वंचित बहुजन आघाडी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, सीआयटियु,एआयटियु,भारतीय बौद्ध महासभा,निवृत्त कर्मचारी संघटना,शिक्षण रोजगार बचाव समिती,शासकीय कंत्राटी कर्मचारी संघ यांच्यासह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून सोमवारी दि.(४) ईव्हीएम हटाव,जी प शाळा बंद करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा,स्वामिनाथन आयोग लागू करावे, क्रिमिलियरची अट रद्द करण्यात यावी, जबरानजोत शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे,जातनिहाय जनगणना व्हावी अशा अनेक मागण्या घेऊन शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत शहरात जनाकोश मोर्चा काढला.
ईव्हीएम मुळे निवडणुका पक्षपाती राहत नाही जगातील विकसित राष्ट्र या प्रणालीचा वापर करत नाहीत त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून ईव्हीएमचा आग्रह का केला जातोय असा प्रश्न यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त झाले.सभेनंतर तहसिलदरांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.मोर्चात हजारो युवक,महिला,शाळकरी मुलांचा सहभाग होता.यावेळी सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी शालिकराव माऊलीकर, सेवानिवृत्त तहसीलदार केडी मेश्राम, ओबीसी कृती संघर्ष समितीचे मोरेश्वर सुरकर,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार,काँग्रेस शहर अध्यक्ष राजू झाडे, वंचित बहुजन पार्टी तालुका अध्यक्ष प्रकाश तोहगावकर,ओबीसी नेते पाल,नगराध्यक्ष सविता कुळमेथे,उपनगराध्यक्ष सारिका मडावी,नगरसेवक वनिता देवगडे,रियाज कुरेशी, तुकाराम सातपुते,गौरव घुबडे,पंकज डांगी,दर्शन वासेकर,अशपाक कुरेशी,शुभम ढपकस,शैलेश बैस,संदीप लाटकर,नबात सोनटक्के,प्रशांत खेडेकर,सरपंच देविदास सातपुते,गौतम झाडे,सारनाथ बकशी,अशोक कुडे,फलके,चैताली फुलझले, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष सोनी दिवसें, रेखा रामटेके, नितेश मेश्राम,ओबीसी नेते शंकर पालं यांच्यासह हजारो नागरिकांचा सहभाग होता