अहेरी :१६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास अहेरी वरून आलापल्ली मार्गानी एटापल्ली कडे जाणारी चारचाकी पीकअप वाहन क्रमांक ची एमएच ३४ एव्हि २०७९ या वाहनाने देशी दारूची तस्करी करीत असल्याची माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने मौजा आलापल्ली-एटापल्ली रोड येथे सापळा रचुन सदर वाहनास थांबवून सदर वाहणाची पंचा समक्ष पाहणी केली असता सदर वाहनाच्या डाल्यामध्ये खाकी रंगाच्या बॉक्समध्ये रॉकेट देशी दारू संत्रा प्रवरा डिस्टिलरी प्रवरानगर असे लिहीलेले किंमत २ लाख ८० हजार रूपये किमतीच्या दारू व १,लाख किमतीचे चारचाकी पिकअप वाहन असा एकुन ३लाख ८० हजार किमतीचा मुद्देमाल मिळुन जप्त करण्यात आल्याने पोस्टे अहेरी यांनी गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.
सदर गुन्हयाच्या तपास पोहवा सत्यमकुमार लोहबरे पोस्टे अहेरी हे करीत आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक निलोत्पल ,अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेशकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख,उपविभागीय पोलीस अधीकारी अजय कोकाटे स
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे पोलिस स्टेशन अहेरी यांच्या नेतृत्वात पोहवा मनोज शेन्डे, पोना हेमराज वाचाडे, पोशी आशीष भारतसागर, पोशी शंकर दहीफळे पोस्टे अहेरी यांनी पार पाडली.