गोंडपिपरी -तालुक्यातील वढोली येथे ग्रामपंचायतीच्या परिसरात दि.(२५)गुरुवारी मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.रुग्णांची तपासणीही झाली काही रुग्ण पात्र देखील ठरले.रुग्णांना नेण्यासाठी तारीख व वेळही देण्यात आली मात्र शस्त्रक्रियेला नेणारी गाडीच न आल्याने रुग्ण संताप व्यक्त करत आल्यापावली घरी परतले.
महात्मे आय बँक आय हॉस्पिटल नागपूर च्या बॅनर खाली वढोली येथे २५ जानेवारीला सकाळी ८ वाजता ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिर ठेवण्यात आली शिबिरात लहान मुलांचा तिरळेपणा,मोतीबिंदू,रेटिना शस्त्रक्रिया अशा अनेक तपासण्या करण्यात आल्या.शिबिरात वढोलीसह परिसरातील अनेक गावातील शेकडो रुग्णांनी तपासणी करून घेतली.पात्र अपात्र सर्वच रुग्णांकडून ३०० रू घेतल्याने फसवणूक झाल्याची शंका रुग्णांनी व्यक्त केली.शिबिरात ४८ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली.रुग्णांना दि.(२९) सोमवारी सकाळी ९ वाजता डॉक्टरांनी ग्रामपंचायतला बोलाविले शस्त्रक्रियेला नेणारी गाडीच न आल्याने रुग्ण संताप व्यक्त करत आल्यापावली घरी परतले.तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी शिबिरा संदर्भात संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.शिबिराच्या ठिकाणी स्थानिक आरोग्य विभागाचे कोणतेही कर्मचारी उपस्थित न्हवते.तालुक्यात नेहमीच असे शिबिर होत असतात मात्र शिबिराची माहिती तालुका आरोग्य विभागाला राहत नसल्याने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे.
चार दिवसांपूर्वी वढोलित शिबिर पार पडले.रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात निवड झालेल्या रुग्णांना दि.(२९) सोमवारी नेण्यासाठी गाडी पाठवणार असल्याचे सांगण्यात आले.मात्र गाडी आलीच नाही व त्यांच्याकडून ३०० रुपये घेतल्याने फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे.डॉक्टरांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.दोन दिवस वाट पाहू त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करणार
– संदीप लाटकर अध्यक्ष तमुस वढोली
शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना न्याय मिळेल या चांगल्या हेतूने शिबिर घेण्यासाठी परवानगी दिली.शिबिरात निवड झालेल्या रुग्णांना न्यायसाठी गाडी न येणे शंकास्पद आहे. फसवणूक झाली असेल तर गावाचा प्रमुख या नात्याने मी स्वतः नागपूर येथे जाऊन प्रकरणाची चौकशी करणार व सर्व रुग्णांना त्यांचे पैसे परत मिळवून देणार न्याय मिळवून देणार
– सरपंच राजेश कवठे वढोली
गोंडपिपरी तालुक्यात असे अनेक शिबिरे होत असतात.त्यात कित्येकदा जनतेची नाहक फसवणूक केल्या जाते.मोफत शिबिर बॅनर लागले असताना पैसे घेणे योग्य नाही.स्थानिक आरोग्य विभागाला शिबिराची माहिती नसणे हे संतापजनक आहे .
-संदीप पौरकर सदस्य ग्रामपंचायत वढोली