निशुल्क आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड शिबिर व शाश्वत शेती बद्दल मार्गदर्शन
वरोरा प्रतिनिधी:- वरोरा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष व माजी सरपंच वंधली मिलिंद भोयर यांच्या नेतृत्वात समाजभवन वंंधली येथे समता फाउंडेशन मुंबई आणि ग्रामपंचायत वंधली व गोदावरी ऍग्रो एजन्सी वरोरा यांच्या संयुक्त सहकार्याने निशुल्क आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड शिबिर व नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर तसेच शाश्वत शेती बद्दल शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन शिबिर सांस्कृतिक भवन वंधली येथे संपन्न झाले.
वंधली ग्रामपंचायत सरपंच प्रविण भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नि;शुल्क आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड शिबीर,नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, शाश्वत शेती बद्दल योग्य मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच अनिल ठावरी, वरोरा तालुका कांग्रेस अध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत सरपंच मिलिंद भोयर, ग्रामपंचायत सदस्य सागर भोयर, सुचीता कुमरे ग्रामपंचायत सदस्या वंधली यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या शिबिराचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णाची निशुल्क तपासणी योग्य सल्ला मार्गदर्शन, मोतीबिंदू असलेल्या 45 रुग्णांची निशुल्क शस्त्रक्रियेसाठी निवड,शेतकरी बांधवांसाठी शाश्वत शेती बद्दल मार्गदर्शन, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड त्वरित तयार करून वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.हनुमंत कुळसंगे, ओमकार दिग्रसकर, परेश आडगावकर, गोदावरी ऍग्रो एजन्सी चे संचालक समीर वानखेडे, समता फाउंडेशन मुंबईचे ज्ञानेश्वर चव्हाण, संकेत भोयर सेवा सहकारी सदस्य वंधली ,ग्रामपंचायत कर्मचारी अतुल धोटे आणि प्रविण पिसाळकर,ग्रामपंचायत माजी सरपंच कमलबाई धोटे, आरोग्य कर्मचारी चिकटे , चिवंडे, वनहक्क समीती अध्यक्ष कमलाकर नैताम, आय सी आर पी सविता चौधरी तसेच महीला बचत गटातील महिला व समता फाउंडेशन मुंबई सर्व टीम व गावातील नागरिक व लाभार्थी उपस्थित होते. या शिबिराचा लाभ माढेळी ,आंबडी,निलजई , वंधली,गिरसावळी,लोणगाडगा, आशी, पाझु्र्णी,नांद्रा,चरुरखटी,एकोणा , वनोजा व परिसरातील दहा ते बारा गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.