.
शिवसेना उ.बा.ठा गटाचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांची मागणी
मूल :– चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. यात तालुक्यातील शेतमालाची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे राज्य शासनाने सोयाबीन,कापूस आदी पिकांना अवकाळी पावसाच्या फटका बसला या बाबत माहिती घेण्यासाठी महसूल विभाग मौका चौकशी करून नुकसानीचा अहवाल बनवीत आहे.यात धान पीक सोडल्याने यात धान पीक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसाचा फटका धान पिकाला बसला आहे. आता धान पीक कापणीला आला आहे. काही भागात मोठ्या प्रमाणात कापणी झाली आहे,धान बांधण्यापूर्वी धान शेतातच सुकायला ठेवल्या जातो आता अचाणक आलेल्या अवकाळी पावसाने कापलेला आणि उभा असलेल्या धान पिकाचे नुकसान झाले ,त्यामुळे सोयाबीन कापूस कडधान्य पीक नुकसानीच्या धर्तीवर धान पीक नुकसानीची मौका पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी.करीता शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत २८ नोव्हेंबर ला निवेदन देण्यात आले.
मुल तालुका धान पीक पट्टा म्हणून परिचित आहे,बहुतांश शेती वर पाण्यावरची असल्याने येतील शेतकरी कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. त्यात नैसर्गिक आपत्तीने त्याचे नुकसान झाले तर कुटुंबाला साभाळणे अडचणीचे होते,आपण या सर्व बाबींचा विचार करून तातडीने धान पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे तयार करावे.आणि शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून दयावी.असे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख आकाश अजय राम,रितिक संगमवार युवासेना तालुका प्रमुख,सुनील काले,महेश चौधरी,गीतेश घोड़े शाखा प्रमुख.मुकेश गांडलेवार,यश संगमवार,वैभव भांडेकर,दादाजी लोडेलीवार, तोहीद शेख,सोहेब खान,सौरव राऊत,प्रमोद बोप्पवार,सौरभ गिरड़कर,ईश्वर कुसराम.मनोज बोप्पावार आदि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.