वरोरा :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 28 नोव्हेंबर ला 133 वा स्मृतिदिन त्यानिमित्य पारस जेन्टस पार्लर येथे त्यांना श्रद्धांजली वाहिन्यात आली.
सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाज सुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले.पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना सर्वांनी आदरांजली वाहिली. यावेळी शेगांव बू येथील सूपरिचित असलेले नाभिक सामाजिक कार्यकर्ते धनराज घुमे यांच्या हेअर सलुन दुकानामध्ये श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख होमराज घुमे, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तालुका अध्यक्ष त्रिशूल बोंन्दगुलवार तसेच जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य असलेले उमेशभ माकोडे माळी समाजाचे नेतृत्व करणारे आणि अध्यक्ष असलेले सचिन फुलकर,निष्ठावंत शिवसैनिक नाना जगताप तसेच वरोरा तालुका संघटक सचिन रासेकर,मानव अधिकार संघ संयोजक तालुका वरोरा कमलाकर कापटे,किसन पाडेवार, गोविंदा ऊईके,शुभम साहारे,प्रकाश खांदारे,प्रकाश सोनार्थी,अनिकेत आंबुलकर, राजू बोकडे,समिर पढाल धनराज घुमे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.