मुलचेरा : एखाद्या गावाचा विकास करायचा असेल तर गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा योगदान मोलाचा ठरतो. मात्र, भावीपिढी घडवायची असेल तर अंगणवाडीसेविकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी केले.
मुलचेरा येथे सुरू असलेल्या अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या तितली प्रशिक्षणाला २३ नोव्हेंबर रोजी भेट देऊन पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार चेतन पाटील, प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरी रॉय आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते अतूट असते. कुंभार ज्याप्रमाणे मातीचा गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो. त्याचप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतात. मात्र, तत्पूर्वी ३ ते ६ वर्षापर्यंत बाळ अंगणवाडीत असतो. त्यामुळे याच ठिकाणी त्या बाळाला खरं आकार मिळते. शिस्त आणि शिक्षणाची गोळी निर्माण होते. हे अत्यंत महत्त्वाचा अंगणवाडीसेविका करतात. त्यामुळेच मुलांना औपचारिक शालेय शिक्षणासाठी काम आणि अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांनी नवनवीन संकल्पना हाती ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना उत्तम दर्जाचे पूर्व प्राथमिक शिक्षण देतील, असेही आशावाद त्यांनी व्यक्त केले.
मागील महिन्यात २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत पहिला टप्पा पार पडला. तर १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. २३ नोव्हेंबर रोजी अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी प्रशिक्षण स्थळाला भेट देऊन अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्याशी चर्चा करून मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
◆ तितली, ही संस्था पूर्व प्रार्थमिक शिक्षणामध्ये प्रगती आणण्यासाठी काम करते. या प्रकल्पाचे मूळ उदेष्य, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ३-६ वर्ष वयोगटातील मुलांना औपचारिक शालेय शिक्षणासाठी तयार करण्यासाठी सक्षम बनविण्याचा प्रयत्न करणे असे आहे. विशेष म्हणजे, भारत सरकारचा उपक्रम, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडचे एक युनिट, तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाद्वारे हा उपक्रम शक्य होत आहे. या प्रकल्पाला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना आणि गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नक्कीच गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे रूप पालटणार व औपचारिक शालेय शिक्षणासाठी मुलं तयार होतील त्यांना पोषक वातावरण मिळेलख अशी आशा व्यक्त केली जात आहे.
◆ औपचारिक शालेय शिक्षणासाठी मुलं होतील तयार
तितली प्रशिक्षणात अंगणवाडीसेविकांना तीन ते सहा वर्षाच्या मुलांना शिकविण्याच्या वयानुरूप पद्धती विकसित करण्यात येत आहे. भाषा, गणित, कथा, कठपुतळी, संकल्पना, नाटक खेळ आणि ब्लॉग्स अशा सात केंद्रावर मार्गदर्शन देण्यात येत आहे. तर नैसर्गिकरित्या उपलब्ध आणि टाकाऊ साहित्य जसे दगड, पाने, फुले, आगपेटी, ओली माती, बिया इत्यादींचा वापर करून विना व कमी किमतीचे शैक्षणिक साहित्य तयार कसे करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा आहे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.