वृत्तसंस्था गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपये दंडाची शिक्षा दिलीय. जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते. मात्र, हे चेक बाऊन्स झाल्याने राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता
शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपये दंडाची शिक्षा दिली आहे . जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते. मात्र, हे चेक बाऊन्स झाल्याने राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता. त्यानंतर आता राजेंद्र गावित यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.