गोंडपिपरी :-भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी च्या वतीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक जनसंपर्क कार्यालयात शहरातील गोरगरिबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
याठिकाणी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना ही करण्यात आली.
दिवाळी म्हणजे भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्वाचा सण. या निमित्तानं सर्वजण आपल्या कुवतीनुसार कपडे, दागिने, नविन वस्तू खरेदी करून हा सण साजरा करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांच्या घरात फराळाचे पदार्थ बनवले जातात आणि त्या फराळाची देवाण-घेवाण करून आनंद साजरा केला जातो. एकमेकांना फराळ देणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. पण आपल्या समाजात काही कुटुंबात आर्थिक दुर्बलता, गरिबीमुळे अशा प्रकारची दिवाळी साजरी करणे शक्य होत नाही. त्यामुळे या लोकांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या आशिर्वादातून जे उर्जा मिळते ते लाखमोलाची असते. त्यामुळेच आज हंसराजभैया अहिर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपा गोंडपिपरीच्या वतीने या फराळाचे वाटप होत आहे, अशी भावना विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
यावेळी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, शहराध्यक्ष चेतन गौर, राकेश पुन, सुहास माडुरवार, विनोद नरेन्दुलवार, सचिन बैस, अण्णा उलेंदला, गणेश डहाळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा ॲड.अरूणा जांभुळकर, नगरसेविका मनिषा दुर्योधन, मनिषा मडावी, कोमल फरकाडे, गणेश मेरूगवार, प्रकाश राफलवार, रमेश डिंगेवार, संजय मास्टे यांचेसह शहरातील महिला भगीनींची उपस्थिती होती.