वरोरा : वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवस थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने शुक्रवार ३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या वरोरा, कार्यालयावर शेकडो शेतकरी व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना घेऊन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मोर्चा काढत कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.चर्चेत कुठलाच निर्णय न झाल्याने आमदार धानोरकरांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून कार्यालयाला कुलूप लावले .त्यानंतर कार्यालयाच्या बाहेर बसून ठिय्या आंदोलन करून हुकूमशाही सरकारचा निषेध केला.
यावेळी भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विशाल बदखल, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगरसेवक राजू महाजन, वरोरा तालुका महिला अध्यक्ष ऐश्वर्या खामनकर, शुभम चिमुरकर, प्रमोद मगरे, बसंत सिंग, निलेश भालेराव, मनोहर स्वामी, फिरोज पठाण, प्रमोद काळे, पुरुषोत्तम पावडे, रवींद्र धोपटे, संजय घागी, गणेश घागी, रत्नमाला अहिरकर, माधुरी चिकटे, सविता सुपी, योगेश खामणकर, अनिल झोटिंग, किशोर डुकरे, मयूर विरुटकर, अनिरुद्ध देठे, विलास गावंडे, सुधाकर कडुकर, किशोर डुकरे, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, संदीप कुमरे, रितेश वाढई, तन्वीर शेख, महेश कोथडे, निखिल राऊत, गुरु थई, सचिन पचारे यांची उपस्थिती होती.
आंदोलनाने अधिकारी नरमले
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार धानोरकर यांच्या रुद्रावताराला सामोरे जावे लागले . तब्बल एक तास कार्यालयात कोंडून ठेवलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलिसांच्या मध्यस्थीने सुटका झाली त्यानंतर वीज वितरण कंपनीचे अधिकारी नरमले असून हि मागणी दोन दिवसात पूर्ण करणार असे आश्वासन दिले. परंतु हे आश्वासन पूर्ण न केल्यास मुख्य अभियंता वीजवितरण कंपनी मर्या चंद्रपूर येथे यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.
दोन दिवसापूर्वी दिला होता आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर जिल्हात खासगी व शासकीय वीजनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून ४४२० मे. वॅ. वीजनिर्मिती होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झुडपी व मोठे जंगल आहे. रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असतात. यावेळी हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यावर हल्ला करीत असतात. यात शेकडो शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. २ दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळे बंद आंदोलन करण्याच्या इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. परंतु सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.