माजरी- दारू तस्करांवर कारवाई करून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली. दारूचा साठा माजरी पोलिस ठाण्यात जमा होता. त्यामुळे इतर समान ठेवायला अडचण होत असल्याने रीतसर न्यायालयाची परवानगी घेऊन बुधवारी माजरी पोलिसांनी २५ लाख ८४३ रुपयाची दारू माजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोकळ्या जागेत नष्ट केली.
माजरी पोलिस ठाण्यांकडून अनेक अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून लाखोंची दारू जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी भद्रावतीच्या न्यायालयात अनेक प्रकरणे सुरु होते. न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणांपैकी अनेक प्रकरणांचा न्यायालयाने निकाल लावला. दरम्यान माजरी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी भद्रावती तसेच जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यामुळे माजरीच्या ठाण्यात जप्त असलेल्या देशी-विदेशी दारूच्या बाटला असा एकूण २५ लाख ८४३ रुपयांचा दारू साठा मंगळवारी दुपारी माजरी पोलिसांनी पंचासमक्ष लोडरच्या मदतीने नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी दारूबंदी विभागाचे अधिकारी सचिन पोळेवर, माजरीचे ठाणेदार अजितसिंग देवरे ,पोउपनि लांजेवार, सचिन पोलेवार दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क , सफौ दडमल ,सफौ पंचोडबारीया व इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.