वरोरा:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 55 व्या पुणतिथी महोत्सव श्री गुरूदेव अध्यात्म गुरूकुल गुरूकंुज मोझरी ता. तिवसा जि. अमरावती येथे दि. 31 ऑक्टोबर पासून सुरू होत असून 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. या महोत्सवात मोठया संख्येने भावीकांना उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अंकुश आगलावे यांनी केले आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमात दररोज सामाुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना ग्रामसफाई प्रवचन, किर्तन, स्पर्धा, भजन, योगासन शिबीर, अभंग गायन, युवक संमेलन सप्तखंजरी प्रबोधन, कौशल्य विकासातुन रोजगार निर्मिती ,राष्ट्रवंदना, ग्रामआरोग्य, सेवा साधना महिला संमेलन बाल किर्तन प्रबोधन राष्ट्रीय किर्तन असे आदी कार्यक्रम होणार आहे.
श्रध्दांजली कार्यक्रमास केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित राहणार आहे. तसेच श्री गुरूदेव अध्यात्म गुरूकुल मोझरी चे अध्यक्ष रवि मानव , सर्वाधिकारी आखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणराव गमे, जिल्हा सेवाधिकारी प्रा. रूपलाल कावळे, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून हरीभाऊ वेरूळकर गुरूजी, सत्यपाल महाराज , भाऊसाहेब धुटे, चंदुभाऊ मारकरवार पाटील, ज्ञारेश्वर रक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून हिलडा कॅलप, अमेरीका भदन्त संघरत्न मानके,जापान आदींची व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.